• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2017

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार

मुंबई : कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासारख्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर मराठा समाजाच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. परंतु सरकारने या मराठा समाजाच्या कोणत्याही मागण्यांबाबत ठोस पाऊले उचलली नसून या मोर्चांच्या अंती सरकारने जुनीच आश्वासने नव्याने देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांनी केली.

        या बाबत बोलताना ते म्हणाले मराठा जो पर्यंत मुंबईमध्ये थांबून होता तोपर्यंत सरकार प्रचंड हादरले होते, परंतु जसजसे मोर्चेकरी माघारी परतु लागले तेंव्हा सरकारने या मोर्च्याकडे दुर्लक्ष केले. आज विधिमंडळात शिष्ठमंडळासोबत आलेल्या मोर्च्यातील लहान मुलीं मुख्यमंत्र्यापुढे आपल्या मागण्या पोटतिडकीने मांडत होत्या परंतु मुख्यमंत्र्यांनी यापुर्वी ५७ मोर्चात जी आश्वासने दिली तीच आश्वासने त्यांना यावेळीही दिली. काही मागण्या पुर्ण करीत असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारखे असे काही नियम व अटी घालायच्या की  त्याचा लाभ गरजू विद्यार्थांना मिळूच नये. शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणत आहेत की स्मारकाच्या उभारणीसाठी टेंडर निघालेले आहे. लवकरच काम सुरु करु, मग आता पर्यंत टेंडर निघालेले नसताना स्मारकाच्या भुमीपुजनाचा घाट कशासाठी घातला होता ? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी सरकारला केला.

      मुख्यमंत्री आज म्हणत आहेत की प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी होस्टेल्स उभारु,  मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात अभ्यासासाठी त्यांनी मंत्र्याची एक समितीची स्थापन करण्याचे आश्वासन दिले. मग आता पर्यंत सरकार काय झोपले होते काय ? मराठा समाजाला शांत करण्यासाठी अशा केवळ घोषणा करायच्या प्रत्यक्षात मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करायची नाही असे या सरकारचे धोरण असल्याची टीका यावेळी अजित पवार यांनी केली.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे

Next Post

राज्यपालांनी कुलगुरूंवर केलेली कारवाई स्वागतार्ह, मात्र अधिक कठोर कारवाई हवी!: विखे पाटील

Next Post
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

राज्यपालांनी कुलगुरूंवर केलेली कारवाई स्वागतार्ह, मात्र अधिक कठोर कारवाई हवी!: विखे पाटील

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

इंदिराजी देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान!: विखे पाटील

ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांनी हुताम्यांना केले अभिवादन

ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांनी हुताम्यांना केले अभिवादन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com