पनवेल : रोटरी क्लब पनवेल सनराईजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमात आदिवासी मुलांसोबत जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी विध्यार्थ्यानी विविध कलाकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि जन्माष्टमीच्या वैज्ञानिक महत्व यावेळी सांगण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रोटरी क्लब पनवेल सनराईजच्या वतीने दरवर्षी चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमात विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यात गेल्या पाच वर्षांपासून जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या उत्सवात आदिवासी विध्यार्थ्यांना जन्माष्टमीचे शास्त्रीय महत्व या विषयावर क्लबचे प्रेसिडेंट मदन बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. तर क्लब सेक्रेटरी शैलेंद्र अक्कलकोटे यांनी जन्माष्टमीची संस्कृती सांगितली. या कार्यक्रमानिमित्त वनवासी कल्याण आश्रमातील मुलांनी विविध कलाकृती सादर केल्या. उपस्थित सर्व गुणवंत विध्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
क्लबचे माजी अध्यक्ष डॉ दीपक खोत यांच्या प्रयत्नातून झालेल्या या कार्यक्रमाला रोटेरिअन प्रदीप ठाकरे,ट्रेजरर बाळकृष्ण आंबेकर, कल्चरल डायरेक्टर प्रकाश काकडे,वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख श्री पावरा सर यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य सहकुटुंब उपस्थित होते. जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचा जन्मोत्सव त्तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळ्यानिमित्त दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.