स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून चालविण्यात येणार्या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या संचालक पदाच्या मंजुरीला स्थगिती देण्याची मागणी बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी नगरविकास गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे 22 ऑगस्ट रोजी एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील (ईटीसी) संचालिका या पदासंदर्भात खोेटे अहवाल नगरविकास राज्य मंत्र्यांकडे संबंधित अधिकार्यांनी स्वाधीन केले होते. 18 ऑगस्टच्या बैठकीत ते सिध्द झाले होते. याबाबत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी योग्य व सत्य अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते याचे स्मरणही आ. मंदा म्हात्रे यांनी निवेदनातून केले आहे.