नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, प्रभाग ८५ आणि ८६च्या वतीने नेरूळ सेक्टर सहा, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर दहा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ई.सी.जी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, सिबिसी, शुगर आदी तपासणी केली जाणार आहे. नेरूळ सेक्टर सहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात सुश्रुषा हार्ट केअर सेंटरच्या सौजन्याने तर कुकशेत गावातील आणि नेरूळ सेक्टर दहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात सनशाईन हॉस्पिटलच्या सौजन्याने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुगर तपासणी करू पाहणार्या रहीवाशांनी उपाशीपोटी सकाळी ८ वाजता शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी यावेळी सांगितले.
या शिबिराच्या माध्यमातून कुकशेत व सारसोळे गावातील ग्रामस्थांनी, नेरूळ सेक्टर सहा आणि दहाच्या रहीवाशांनी आपली आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.