सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळमध्ये एनएमएमटी प्रवासी पास केंद्राची महापालिका परिवहन उपक्रमाने कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे एनएमएमटीच्या बसेसमधून प्रवास करणार्या विद्यार्थी, महिला,नागरिक यासह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी नेरूळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यसम्राट नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे एनएमएमटी प्रवासी पास केंद्र नेरूळमध्ये लवकरात लवकर सुरू करण्याची लेखी मागणी शनिवारी (दि. १६ सप्टेंबर) केली आहे.
ऐरोली, कोपरखैराणे, तुर्भे, वाशी, सीबीडी या ठिकाणी एनएमएमटीची प्रवासी पास केंद्रे आहेत. नवी मुंबईत अन्य नोडच्या तुलनेत नेरूळचे नागरिकरण मोठ्या प्रमाणावर विस्तारीत स्वरूपात झालेले आहे. या महत्वाच्या नोडमध्ये प्रवासी पास केंद्र नसल्याने एनएमएमटी बसमधून प्रवास करणार्या नेरूळवासियांची होत असलेली गैरसोय कार्यसम्राट युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.