आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत यांचा पाठपुरावा
पनवेल : सुरक्षा मंडळामध्ये नोंदणी होऊनही सहा महिन्यापासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या ४५ सुरक्षा रक्षकांना अखेर नोकरी मिळाली असून यासाठी प्रयत्न करणारे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तसेच कामगार नेते जितेंद्र घरत यांचे सुरक्षा रक्षकांनी सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले.
पनवेल परिसरातील या सुरक्षा रक्षकांची रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाकडे सहा महिन्यापूर्वी नोंदणी झाली होती. मात्र त्यांना नोकरी मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेकडे आपले गाऱ्हाणे मांडले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व कामगार जितेंद्र घरत यांनी सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार या कामगारांना खारघर येथील राष्ट्रीय फॅशन टेक्नोलोंजी संस्थेत नोकरी मिळाली असून ते २५ सप्टेंबरपासून या आस्थापनेतील सेवेत रुजू होणार आहेत.
आज घटस्थापनेच्या दिवशी या सुरक्षा रक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर, जितेंद्र घरत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, युवा पांडुरंग पाटील, कामगार प्रतिनिधी राजेश कुंभार, रमेश साळवी, संदीप कामठे यांच्यासह सुरक्षा रक्षक उपस्थित होते.