मुंबई / निलेश मोरे
दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाच्या मुसलधारेने मुंबई ठप्प झालेली असताना चेंबूर ते सीएसएमटी कडे जाणारी रेल्वे दररोज 9 वाजून 11 मिनिटांनी सुटते मात्र गेले काही दिवस यावेळची रेल्वे सेवा बंद असल्या कारणाने रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते . 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9:15 ; वाजता प्रवाशांनी आपला संताप उग्र करत आंदोलन केले . प्रवाशांनी हार्बर मार्गावरील रेल्वे रुळावर थांबून तास भर रेल्वे सेवा थांबवली . प्रवाशांच्या आंदोलनामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा 40 ते 50 मिनिटे उशिराने धावत होती . रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी यांनी प्रवाशांना समजूत घालून हे आंदोलन आटोपते केले . दुसरी लोकल येताच प्रवाशांनी त्यातून प्रवास करत प्रवाशी सीएसएमटीकडे रवाना झाली.