• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 22, 2017

सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

गाव तेथे सेवादलाची शाखा अभियान राबवणार

 मुंबई : गाव तेथे सेवादलाची शाखा अभियान राबवून सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प काँग्रेस सेवा दलाचे नुतन प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी व्यक्त केला आहे.

आज दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष, तसेच प्रदेश कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया काँग्रेस सेवा दलाचे संघटक के. के. पांडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मावळते अध्यक्ष शशिकांत थोरात हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सेवा दलाचे नुतन प्रदेशाध्यक्ष विलास औताडे म्हणाले की,  काँग्रेस सेवा दल या अत्यंत शिस्तप्रिय संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाला बळकटी देऊ. प्रांताध्यक्ष मा. खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनिवण्यासाठी सिंहाचा वाटा उचण्याचा निर्धार  त्यांनी सर्व प्रदेश व जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत व्यक्त केला. त्यासाठी नियोजनबद्द पध्दतीने महाराष्ट्राचा दौरा करुन गाव तेथे सेवा दलाची शाखा हे अभियान राबवणार असून येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व जिल्हे व ब्लॉक मध्ये सेवा देलाच्या बॅनरखाली विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे औताडे म्हणाले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय तायडे-पाटील यांनी केले तर आभार प्रशांत वाढेकर यांनी मानले.  यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या महिला संघटक नंदा मिश्रा, सुलभा नागपूरकर, स्मिता कुंभारे, राजेंद्र फेंगडे, रामप्रसाद खत्री, वसंतराव गाडगे, राजीवकुमार गरोडे, विलास शाळू, शेखर पाटील, केशवराव मुरतडक आणि निर्मल देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Previous Post

आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी घेतला स्वच्छतेचा आढावा

Next Post

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

Next Post
लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात  राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com