सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पाऊसाची उघडीप होताच गरबा व दांडिया खेळण्यास युवा पिढीची पाऊले पुन्हा नवरात्र उत्सवाकडे वळू लागली आहेत. नेरूळ सेक्टर सहामध्ये भाजी मार्केटलगतच्या मैदानावर भगवती महिला मंडळ आयोजित आणि शिवसेना पुरस्कृत नवरात्र उत्सव पुन्हा तरूणाईचे आकर्षण बनू लागला आहे.
समाजसेवक प्रल्हाद नारायण पाटील आणि समाजसेविका सौ. समुद्राताई प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन होत असून नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील महिला, मुली, युवक, रहीवाशी या ठिकाणी गरबा आणि दांडिया खेळण्यास येतात. रात्री ८ ते १० या वेळेत रहीवाशांनी या ठिकाणी गरबा व दांडीया खेळण्यास तसेच देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन सौ. समुद्राताई प्रल्हाद पाटील यांनी केले आहे.