स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नागरी समस्या सोडविण्याबरोबरच बेलापुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालय ते मंत्रालय पाठपुरावा करणार्या भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आता रहीवाशांच्या आरोग्यांवर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीच्या शुभदिनी बेलापुरात योग शिबिराचा शुभारंभ केला असून दोन महिने हे योग शिबिर चालणार आहे.
दिवसेंदिवस धावपळीच्या जिवन शैलीने दैनिक दिनचर्येवर विपरीत परिणाम होवुन प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारिरीक व्याधींनी ग्रस्त होत आहे. अशा प्रत्येकांसाठी कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आरोग्य निरोगी राहण्यासाठी, श्री गोवर्धनी माता मंदिर, किल्ले गावठाण, बेलापुर येथे, गुरुजी श्री. जगदीश मुनीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन महिने सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत योग शिबिराचे आयोजन केले आले आहे. ह्या शिबिरामध्ये आपल्याला मोफत योगाचे प्रकार शिकवले जातील तसेच आपण काही व्यांधीपासून त्रस्त असाल उदा. गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी इ. व्यांधीवर या योग शिबीरात आपल्यावर आवश्यकतेनुसार मोफत उपचार व योग्य मार्गदर्शन सुध्दा केले जाईल.
हे योग शिबीर २ ऑक्टोबरपासून ते २ डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तरी जास्तीत जास्त नवी मुंबईच्या जनतेने या योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन, कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी हेमंत कोळी ९१६७३०२८२७ यांच्याशी संपर्क साधावा.