अनंतकुमार गवई
नवी मुंबई: नवी मुंबईकरांवर लादण्यात आलेले भारनियमन रद्द न केल्यास त्याविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सुरज पाटील यांनी एमएसईडीसीच्या कार्यकारी उपअभियंत्यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
नागरिकांना कोणत्याही पूर्वसूचना न देता हे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग, गृहीणी आणि विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा संताप सुरज पाटील यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे. हे भारनियमन लवकरात लवकर रद्द करून नवी मुंबई भारनियमनमुक्त करण्याची मागणी सुरज पाटील यांनी केली आहे.