• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2017

विशेष मिशन इंद्रधनुषच्या मोहिमेस महापालिका सज्ज

adminbyadmin
in नवी मुंबई
0
विशेष मिशन इंद्रधनुषच्या मोहिमेस महापालिका सज्ज
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई :  केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नमुंमपा कार्यक्षेत्रात माहे ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण अभियानाच्या माहे ऑक्टोबर मधील विशेष मिशन इंद्रधनुषच्या मोहीमेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
बालकामधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात. यास्तव या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करायचे आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेचे उद्दिष्ट 0-2 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला डयु लिस्ट प्रमाणे नियमित लसीकरण करुन नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण डिसेंबर 2018 पर्यंत 90% पेक्षा जास्त करणे व यामध्ये प्रत्येक बालक पूर्ण संरक्षित होण्यासाठी राजकीय, प्रशासकीय, आर्थिक विभाग व इतर विभागांचा सक्रिय सहभाग घेणे असे आहे.
याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती स्थापन केली असून सदर टास्क फोर्सची सभा दि. 20/9/2017 रोजी घेण्यात आली. सदर बैठकीत महापौर सुधाकर सोनावणे व महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदर मिशनकरीता नमुंमपा कार्यक्षेत्रातील IMA/IAP/NMOGS संस्थाचे सेक्रेटरी/अध्यक्ष यांची सभा घेऊन सदर मिशनकरीता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर मोहीमेमध्ये 0-2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता ज्यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे यापूर्वी देय असलेल्या सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही अथवा लसीकरण न घेतलेल्या बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.
सदर मोहीमेकरीता नमुंमपा कार्यक्षेत्रातील 9,14,611 लोकसंख्येमध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले असून 2,71,688 घरामध्ये सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच 86 बाहयसत्र (Outreach) व 3 मोबाईल असे एकूण 89 विशेष मिशन इंद्रधनुषची सत्रे वेगवेगळया ठिकाणी आयोजित केली असून यामध्ये  0-2 वर्षे वयोगटातील 3556  मुले व 831 गरोदर माता अशा एकंदरीत 4387 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लस, इ. सर्व तयारी करण्यात आली असून जनतेमध्ये जनजागृती करीता स्टीकर, पोस्टर, हस्तपत्रके, बॅनर, पताका, होर्डींग याद्वारे प्रसिद्धी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक लाभार्थीला दिवाळीच्या शुभेच्छांसहीत लसीकरणाची आठवण करुन देणेकरीता भेटकार्ड देण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरीकांनी, स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, संघटना, खाजगी वैद्यकीय व्यावसाईक, बालरोगतज्ञ, सार्वजनिक मंडळे, महाविदयालये, शिक्षण संस्था यांनी सदर राष्ट्रीय अभियानाअंतर्गत बालके आणि गरोदर माता यांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे व सदर मोहीम 100% यशस्वी  पार पाडण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे व महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.
Previous Post

40 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘वॉकेथॉन’मधून प्रसारीत केला खेळातून व स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश – लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये होणार नोंद

Next Post

विकासाचे दावे करणाऱ्यांनी नांदेडमध्ये वीस वर्षांच्या सत्ता काळात काय विकास केला? -कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

Next Post
विकासाचे दावे करणाऱ्यांनी नांदेडमध्ये वीस वर्षांच्या सत्ता काळात काय विकास केला? -कामगार मंत्री  संभाजी पाटील निलंगेकर

विकासाचे दावे करणाऱ्यांनी नांदेडमध्ये वीस वर्षांच्या सत्ता काळात काय विकास केला? -कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून कोपरखैरणेत साकारलेल्या  नवी मुंबईतील पहिल्या डिजीटल स्कुलचे उद्घाटन

आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून कोपरखैरणेत साकारलेल्या नवी मुंबईतील पहिल्या डिजीटल स्कुलचे उद्घाटन

अगोदर स्वच्छ आदत भारत घडवू

अगोदर स्वच्छ आदत भारत घडवू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com