दिपक देशमुख / मुंबई
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी आज पत्रकार परिषद सुरु असताना पोलीस विभागाचे दोन कर्मचारी ( स्पेशल ब्रँच ) हजर असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे. सरकार विरोधी पक्षावर गुप्तपद्धतीने पाळत ठेवत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.