दिपक देशमुख / मुंबई
हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त १६ फेऱ्या यांचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आले आहे. पनवेल ते वडाळा या लोकलचे स्वागत सातत्याने पाठपुरावा करणारे खा. राजन विचारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याकडून बेलापूर रेल्वे स्थानकात त्या रेल्वेचे मोटरमन यांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखवून हि लोकल पुढे सोडण्यात आली. त्यावेळी बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, गटनेते द्वारकानाथ भोईर, शहरप्रमुख विजय माने,मा.नगरसेवक दिलीप घोडेकर, रतन माडवे, विभागप्रमुख निळकट म्हात्रे, मिलीद सुर्येराव, युवासेना बेलापूर, उपविधानसभा अधिकारी सिध्दाराम शिलवंत,शाखाप्रमुख महेश कोटीवाले, विशाल विचारे, गणेश घाग, हे उपस्थित होते.