नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना १९७२ नंतर अखेर न्याय मिळाला असून ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील जमिनी संपादित केल्यानंतर २४ पैकी १४ गावांच्या गावठाणांचे ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण पूर्ण होऊन मालमत्ता पत्राचे वाटप करण्यास प्रत्येक गावात सुरुवात झाली आहे.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत सिटी सर्वेक्षण झालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वितरणास प्रत्येक गाव निहाय सुरुवात झाली असून २३ फेब्रुवारी रोजी दारावे गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत शासकीय अधिकारी यांनी स्वतः आपल्या दारात येऊन मालमत्ता पत्रके वाटप केली असून सदर मालमत्ता पत्रके वाटप शिबिरे प्रत्येक गावात घेण्यात येणार आहेत, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबई विकसित शहर असून शहराच्या विकासासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या १०० टक्के जमिनी दिलेल्या आहेत. गावठाणातील ग्रामस्थांची बांधलेली घरे नियमित करावीत. नवी मुंबई महापालिका अंतर्गत येणार्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे. या संदर्भात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अनेकवेळा शासनदरबारी पाठपुरावा केला होता.
यासंदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, ‘सिडको’च व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी तसेच ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याबरोबरही अनेक बैठका झाल्या होत्या. तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) मिळावे असा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा याकरिता आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गावागावात जाऊन प्रकल्पग्रस्तांसह गावबैठका घेतल्या होत्या.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सदर प्रयत्नांना यश येऊन नवी मुंबई गावठाण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते बेलापूर आणि शिरवणे गाव येथील ग्रामस्थांना तसेच बेलापूर-दिवाळे, शाहबाज आग्रोळी गावातील ग्रामस्थांना यापूर्वी प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले होते.
यानंतर आता स्वतः शासकीय अधिकारी शासन आपल्या दारी अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करणार असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी सदरचा मोठा निर्णय असून गावठाणातील प्रत्येक घरांस आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याने
आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा प्रकल्पग्रस्तांना मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया आणि घरे विकसित करण्याकरिता येणार्या अडचणी दूर होणार आहेत. अनेक वर्षापासूनचा सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक केले जात आहे.
नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या १०० टक्के जमिनी दिलेल्या असताना नवी मुंबई महापालिका अंतर्गत येणार्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात यावे, असा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तसेच शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. ठाणे जिल्हाधिकारी यांच्यासमवेतही अनेक बैठका पार पडल्या. सदर प्रश्नाबाबत गावागावात ग्रामस्थांच्या बैठकीहा घेतल्या गेल्या. त्यामुळे अनेक वर्षापासूनचा प्रलंबित सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे नवी मुंबई ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांना आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा मिळाला असल्यामुळे अनियमित घरे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
दारावे येथील प्रॉपर्टी कार्ड वाटप प्रसंगी परीक्षण भूमापक सुनील ढोमणे, वरिष्ठ लिपिक भहाडकर, गुरुवर्य बाळाराम पाटील, नगरसेवक सुनील पाटील, रणजीत नाईक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.