सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- समाजसेवक वर्गीस डॅनियल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नेरूळच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
नेरूळ पश्चिम परिसरातील नेरूळ सेक्टर १६,१८, २४ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वर्गीस डॅनियल यांचा वाढदिवस शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शालेय मुलांकरिता साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग ९६-९७ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस, नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशदादा भगत आणि नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. सेक्टर १६ए मधील कै. वत्सला रामा भगत या महापालिका शाळा क्रमांक ९ येथील विद्यार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिकेतील सभागृह नेते रवींद्र इथापे, महापालिका परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, शाळेच्या मुख्याध्यापिका पूनतांबेकर, समाजसेविका सुरेखा देठे, विमल गांडाल, चंद्रकांत महाजन, अनंत कदम, सुेखा ठाकूर, बाळू हिंगे, सागर मोहीते, सत्यवान घाडी, कुणाल भालेराव, राकेश तांडेल, दिपक जाधव, संतोष पावसकर, मल्हार मानकुमरे आणि आसिफ शेख उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविल्याबद्दल नेरूळ पश्चिमेला गणेशदादा भगत यांची प्रशंसा होत आहे.