दिपक देशमुख
नवी मुंबई :ऐरोली सेक्टर येथील प्रसिद्ध असणाऱ्या श्री राघवेंद्र फास्ट फूड आणि ज्यूस सेंटर वरील एक समोसा घातलेल्या ग्राहकाला घाण आढळून आली.त्यामुळे तिथे नास्ता करत असलेल्या दुसऱ्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुले अस्वच्छ खाद्य देणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
घनसोलीतील रहिवाशी स्वप्नील जुणघरे हे रिक्षा व्यावसायिक आहेत.सोमवारी दुपारी एकच्या सुमारास भूक लागली म्हणून ऐरोली सेक्टर 5 ,सहकार बाजार समोरील श्री राघवेंद्रफास्ट फूड व ज्यूस सेंटर येथे समोसा खाण्यासाठी गेले.समोसा खात असताना सेवटच्या घासा मध्ये त्यांना सडलेला बटाटा आढळला.त्यामुळे त्यांनी श्री राघवेंद्र फास्ट फूड व ज्यूस सेंटरच्या काउंटर वर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.परंतु त्याच्या उलट सुलट व उद्धट उत्तरा मुले त्यांनी थेट विभाग कार्यालय ऐरोली गाठले.परंतु खाद्या विषयी तक्रार करायची असेल तर अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे सल्ला दिला.
अनेक खाद्य विकल्या जाणाऱ्या ठिकाणी अश्याच घटना नियमित होत आहेत.त्यामुळे अनेक नागरीकाना पोटाची विषबाधा होते.तसेच आरोग्यास इजा पोहचते म्हणून संबंधित व्यावसायिकांवर कायद्या नुसार कारवाई करावी अशी मागणी ग्राहक स्वप्नील जुंनघरे यांनी केली आहे. या बाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहाययक आयुक्त पी.आर.सिंगरवाड यांना अनेकदा भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी भ्रमणध्वनी घेण्याची तसदी घेतली नाही.