* ४ नगराध्यक्ष भाजपाचे, १ स्वाभिमान तर १ अपक्षांचा
* भाजपाने पुन्हा एकदा केले निर्विवाद वर्चस्व सिद्ध
* ११५ पैकी ५७ नगरसेवक भाजपा आणि भाजपासमर्थित
* भाजपा-शिवसेना मिळून ७९ नगरसेवक
* सेना : २२, कॉंग्रेस : ९, अपक्ष १०, मनसे : २ आणि तिसरी आघाडी : १
मुंबई :- भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ६ पैकी ४ नगरपालिकांमध्ये सत्ता काबीजकेली असून, एका ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचा तर एका ठिकाणी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे.
आज ज्या ६ नगरपालिकांचे निकाल हाती आले, त्यानुसार, एकूण ११५ पैकी ५७ ठिकाणी भाजपा आणि भाजपा समर्थित नगरसेवक निवडून आले आहेत.यातही ४८ नगरसेवक हे भाजपाच्या तिकिटावर तर ९ हे समर्थित आहेत. जामनेरमध्ये सर्वच्या सर्व २४ जागा भाजपाने आपल्याकडे ठेवल्या. अन्यकुठल्याही पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आजरा येथे भाजपा आणि ताराराणी यांनी ९ जागा जिंकून नगराध्यपद पटकाविले. याठिकाणी कॉंग्रेसला ६,तिसर्या आघाडीला १ आणि एका जागी अपक्ष निवडून आले आहेत. वैजापूर, देवरूख येथेही भाजपाने अध्यक्षपद काबीज केले आहे. देवरूखमध्येभाजपाला ७ तर वैजापूर येथे ८ जागा मिळाल्या. कणकवलीत १० जागा जिंकून स्वाभिमानीचे नगराध्यक्ष झाले आहेत. ३ जागा भाजपाने मिळविल्याआहेत. गुहागरमध्ये शहर विकास आघाडीने ९ जागा जिंकल्या असून , ६ जागी भाजपा निवडून आली आहे.
राज्यात सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुकींमध्ये भाजपाचा आलेख सतत उंचावतच राहिला आहे.