दीपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिका प्रभाग ८७ या प्रभागात नेरूळ सेक्टर आठ आणि सेक्टर दहामधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश आहे. या ठिकाणी सतत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या घटना घडत आहे. काल झालेली एका मुलीच्या अपहरणाची घटना, पतपेढी फोडणे, लुटमार, विनयभंग यासह अन्य घटना या परिसरात घडतच आहेत. त्यामुळे या घटनांचा लवकरात लवकर शोध लागावा यासाठी नेरूळ सेक्टर आठ व दहामधील चौकात, रस्त्यावर, अर्ंतगत रस्त्यावर तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त रामास्वामी यांच्याकडे केली आहे.
प्रभागातील वाढत्या दुर्दैवी घटनांबाबत चिंता व्यक्त करत महापालिका प्रशासन सीसीटीव्ही मागणीकडे गेली ८ वर्षे दुर्लक्ष करत असल्याने या समस्येचे गांभीर्य महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी स्थानिक रहीवाशांच्या शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्तांची भेट घेतली व सीसीटीव्ही नसल्याने होत असलेल्या समस्यांचे गांभीर्य पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
यापूर्वी मागील सभागृहात माझे यजमान रतन नामदेव मांडवेसाहेब यांनी या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. कालच माझ्या प्रभागात एका मुलीच्या छेडछाड व विनयभंगाची घटना घडली असून नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांची तक्रारही नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी माझ्या प्रभागात मुलींची छेडछाड, विनयभंग, घरफोडी, वाटमारी, लुटमार यासह अन्य गुन्हे घडलेले आहेत. प्रभागातील चौकाचौकात, रस्त्यावर, अर्ंतगत रस्त्यावर, उद्यानासारख्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही पालिका प्रशासनाने बसविले असते तर या गुन्ह्याचा लवकरात लवकर शोध घेणे पोलिसांना शक्य झाले असते. प्रभागात रस्ते, चौक, अर्ंतगत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत यासाठी मी गेली ३ वर्षे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्यापूर्वी पाच वर्षे माझे यजमान व तत्कालीन या प्रभागाचे नगरसेवक रतन नामदेव मांडवेसाहेब यांनीही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या असून परिसरातील रहीवाशी त्यांच्या परिवारासह गावी जाण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत लुटमार व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. कालच एका मुलीच्या विनयभंगाची घटना घडली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही अभावी प्रभागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आठ वर्षे प्रभागातील जनतेच्या सुरक्षेसाठी रस्ते, अर्ंतगत रस्ते, चौक, सार्वजनिक जागा या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याविषयी आम्ही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत. पालिका प्रशासन या महत्वपूणर्र् मागणीविषयी उदासिनता दाखवित आहे, ही खरोखरीच संतापजनक बाब असल्याचे चर्चेदरम्या पालिका आयुक्त रामास्वामी यांना सांगत़ नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नाराजी व्यक्त केली.
आहे. नजीकच्या काळात अशा प्रकारची कोणती घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार राहील, याची आपण दखल घ्यावी. आम्ही सातत्याने या मागणीकरिता आठ वर्षे करत असलेला पाठपुरावा व समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून आपण संबंधितांना तात्काळ माझ्या प्रभागातील रस्ते, अर्ंतगत रस्ते, चौक व सार्वजनिक जागेवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करावी, अशी मागणी यावेळी शिवसेना नगरसेविका मांडवे यांनी पालिका आयुक्तांकडे केली. यावेळी शिष्टमंडळात शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शरद पाजंरी, शलाका पांजरी, जयश्री बेळे, शुंभागी परब, सौ. सुरेखा मोरे, सौ. सुजाता सावंत, सुरेश मोरे यांचा समावेश होता.
महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी शिष्टमंडळासमवेत चर्चा करत सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याचे मान्य केले. तसेच या प्रभागातील उद्यानातील सुरक्षा रक्षकांच्या समस्येवर बोलताना पालिका आयुक्तांनी लवकरात लवकर उद्यानांना सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.