** ठाणे-बेलापूर मार्गावरील उडडाणपूल आणि भुयारीमार्ग पुर्णत्वाकडे ** आमदार संदीप नाईक यांनी केला पाहणीदौरा
नवी मुंबई :- ठाणे-बेलापूर मार्गावर घनसोली आणि सविता केमिकल येथे निर्माणाधिन असलेले उडडाणपूल आणि महापे येथील भुयारी मार्ग पुर्णत्वाकडे जात असून आमदार संदीप नाईक यांनी या प्रकल्पांच्या कामांचा शुक्रवारी पाहणीदौरा केला. डेडलाईन आखून या प्रकल्पांचे काम घाईगडबडीत पूर्ण करण्यापेक्षा त्याची गुणवत्ता राखून ते पूर्ण करावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत पावसाळयाच्या अगोदर हे काम पूर्ण करावे, अशी सुचना आमदार नाईक यांनी या प्रसंगी केली. येत्या मे महिन्यापर्यत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर दिघा ते बेलापूर हा एक तासांचा प्रवास अदाजे २० ते २५ मिनिटांवर येणार आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर सविता केमिकल कंपनी, नोसिल नाका आणि लोकमत सर्कल या ठिकाणांवर सर्वात जास्त वाहतुककोंडी होते. नवी मुबई पालिकेने तयार केलेल्या विकास आराखडयात या ठिकाणी उडडाणपूल आणि भुयारी मार्गाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१४मध्ये एक विशेष जनता दरबार वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान देखील उपस्थित होते. लोकनेते नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार एमएमआरडीएने ठाणे-बेलापूर मार्गावर १५५ कोटी रुपये खर्चाचे उडडाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेतले. हे प्रकल्प लवकरात-लवकर सुरु व्हावेत यासाठी आमदार संदीप नाईक यांनी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार, मंत्री, एमएमआरडीएचेअधिकारी यांच्या भेटीगाठी, आणि विधानसभा अधिवेशनांमधून या सबधीचा विषय उपस्थित करुन पाठपुरावा केला आहे. आता हे उडडाणपूल आणि भुयारी मार्गाची पुर्णत्वाकडे वाटचाल सुरु आहे. भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर लोकमत सर्कलवरील वाहतुकोडी फुटणार आहे. या ठिकाणी एक सिग्नल बसणार असून ठाण्याकडून पुढे कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणारी वाहने आणि ठाणे तसेच बेलापूरकडून येणारी-जाणारी वाहने येथून सुरळीतपणे जाणार आहेत. नोसील नाका येथे दीड किलोमिटरचा उडडाणपूल असल्याने येथील वाहने देखील जलद गतीने रबाळेपासून लोकमत सर्कलपर्यत प्रवास करु शकतील. या उडडाणपूल आणि भुयारी मार्गांमुळे घनसोली, नोसिल नाका आणि सविता केमिकल कंपनी या ठाणे-बेलापूर मार्गावरील सर्वात जास्त वाहतुकोंडीच्या ठिकाणांवरील वाहतुककोंडी नाहिशी होवून येथील वाहतुक सुरळीत होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्यात सुरु झाल्यावर वाढणारी वाहतुककोंडी लक्षात घेता तुर्भे येथे आणखी एक उडडाणपूल बांधल्यास या मार्गावरील वाहतुक आणखी जलद गतीने होईल, अशी सुचना देखील आमदार नाईक यांनी केली आहे.
उडडाणपूल आणि भुयारी मार्गांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुक सुरळीत होणार असली तरी ऐरोली मार्गे पुढे मुलुुडमधून मुंबईत जाताता वाहतुककोंडीची भिती आहेच. भविष्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या मार्गावरील वाहतुक आणखी वाढणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमआरडीए) माध्यमातून ऐरोली ते कटई नाका असा सुमारे १२.३० किलोमिटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्या करीता ९४४.२० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रवास करण्याच्या दृष्टीने देखील हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. ऐरोली ते कटई नाक्याकडे जाणार्या प्रस्तावित बोगद्यावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी अलिकडेच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात केली आहे. त्यानुसार या कामाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येणार आहे. या मार्गिकेच्या निर्मितीनतर ठाणे-बेलापूर मार्गावरुन पुढे ऐरोली-मुुलुड आणि मुंबई येथील मार्गावरील वाहतुककोंडी टळून येथील प्रवास देखील सुखकर होणार आहे.
उडडाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांमुळे नवी मुंबई पालिकेचे रस्ते आणि सौदर्यीकरण केलेल्या परिसराचे नुकसान झाले आहे. त्याची डागडुजी करुन देण्याचे आश्वासन देखील एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी आमदार नाईक यांना दिले आहे.
या पाहणीदौर्या प्रसंगी आमदार नाईक यांच्या समवेत महापौर जयवंत सुतार, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे उप अभियंता जी. व्ही. राठोड, सल्लागार डी. व्ही. शेंडे,पालिकेचे कार्यकारी-अभियंत सजय देसाई, उपअभियंता कुलगर्णी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*****
असे आहेत उडडाणपूल, भुयारीमार्ग..
सविता केमिकल उडडाणपूल…
लांबी ५७५ मिटर
रुंदी ८.५ मिटर
लेन २
दिशा ठाणे ते बेलापूर
खर्च २४.५ करोड
******
घनसोली-तळवली उडडाणपूल..
लांबी १४५० मिटर
रुंदी १७ मिटर
लेन ४
खर्च ११२.२५ करोड
*****
महापे भुयारी मार्ग…
लांबी ४८५ मिटर
रुंदी १२ मिटर
लेन ३
दिशा ठाणे-बेलापूर
खर्च १८.२५ करोड