नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाविरोधात अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक कारवाई करण्यात येत असून, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ विभागात धडक कारवाई करण्यात आली.
नेरुळ विभाग अधिकारी श्री. संजय तायडे आणि त्यांच्या अतिक्रमण विरोधी पथकाने साबुद्दीन यांचे सेक्टर 1, आशिर्वाद हॉस्पिटलच्या बाजूल एक मजली आर.सी.सी. अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस देण्यात आली होती. तरी देखील संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवल्याने आज ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
या मोहिमेत 10 कामगारांसह अतिक्रमण विभागाकडील पोलीस बंदोबस्तात 2 पोकलेन, 1 जे.सी.बी., 1 टोईंग, 1 डंपर साहित्याचा वापर करण्यात आला. अशाच प्रकारच्या अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमा यापुढील काळात अधिक प्रभावीपणे सर्वच विभागांत सुरू राहणार आहेत.