नवी मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नेरूळ सेक्टर-२२ येथील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सार्वजनिक सुलभस्वच्छतागृहाचे उदघाटन नुकतेच पार पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून स्वच्छ अभियानांतर्गत असणाऱ्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाच्या उदघाटन प्रसंगी स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूर्वक बाबी असून स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान माझ्या बेलापूर मतदारसंघात राबविण्याचा मला अभिमान असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी मांडले. नेरूळ पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एक सुसज्ज असे स्वच्छता गृह हवे असल्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून वारंवार होत होती. रेल्वे स्थानकालगतच अनेक हॉटेल्स, दुकाने, बाजार तसेच तेरणा हॉस्पिटल असल्याकारणाने स्थानिकांसह बाहेरील येणाऱ्या नागरिकांनाही सदर समस्यांना सामोरे जावे लगत होते. स्थानिकांच्या वारंवार होणाऱ्या मागणीमुळे आमदार निधीतून सुसज्ज असे सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याच अनुषंगाने त्यांना सुसज्ज असे स्वच्छता गृह उपलब्ध करून त्यांची मागणी पूर्ण केल्याने आनंद वाटत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नेरूळ पश्चिम येथील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी स्वच्छता गृह उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त करीत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
याप्रसंगी आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांसमवेत दत्ता घंगाळे, मंगल घरत, जयवंत तांडेल, राजू तिकोने, मकरंद म्हात्रे, सुधीर जाधव, शशिकांत मोरे, रमेश नरवडे,रियाज सिद्दिकी, हेमंत कोळी तसेच असंख्य स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.