नवी मुंबई :- देशाच्या कानाकोपर्यात दररोज मुलींवर, महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. दरररोक कितीतरी निर्भयांना कोणाच्या तरी वासनेचे शिकार बनावे लागत आहे. या अत्याचारित निर्भयांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी आणि अशा नराधमांचा निषेध करण्यासाठी कामोठेत नागरिकांकडून ‘कॅडल मार्च’ काढण्यात आला.
देशातील असंख्य निर्भयांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ “JusticeForAasifa”‘ ह्या हैश टॅग खाली कामोठ्यामध्ये जय दादा युवा मंच कामोठे व समस्त कामोठे कर नागरिकांच्या वतीने देशातील महिला तसेच लहान चिमुरडीही स्वतः असुरक्षित वाटून घेत आहे इतके वातावरण दूषित आहे. सततच्या अत्याचाराच्या घटना घडत आहे आणि नागरिकांच्या मनात सुप्त आक्रोश जागृत होत आहे. देशाच्या कानाकोपर्यात होत असलेल्या अशा सर्व घटनांचा निषेदार्थ कामोठे मधील तरुण-तरुणी एकत्र येवून मानसरोवर रेल्वे स्टेशन ते कामोठे पोलीस स्टेशन असा कॅडल मार्च मार्च आयोजित केला होता.
असंख्य तरुण-तरुणी या मार्चमध्ये सामील होवून सेक्टर ३६ येथील चौकात ‘असिफा’सारख्या अनेक निरपराध मुलींना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमासाठी जयकुमार डीगोळे , आशुतोष सोनावणे , प्रशांत मिश्रा , शिवम तिवारी , संदीप भणगे , उमेश भोईटे , विकी सिंग ,आशुतोष तलरेजा यांनी पुढाकार घेतला.तसेच या कॅडल मार्चमध्ये यावेळी सर्वधर्मीय महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. अनेक प्रतिष्ठित नागरिक व नगरसेविका हेमलता रवि गोवारी या देखील सहभागी झाल्या होत्या आणि सुलक्षणा जगदाले,संगीता राउत, सुवर्णा वाळुंज, शमशाद बेगम व इतर महिला बहुसंख्येनेे उपस्थित होत्या.