पनवेल :- पनवेल महापालिका भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे.
महापालिकेचे झोपडपट्टी सुधारणा पुनर्विकास व सामाजिक विकास सभापती, जिल्हा नियोजन सदस्य, तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश बिनेदार काम करीत आहेत. शैलीदार वक्तृत्व व संभाषण कला त्यांच्याकडे असून महापालिकेत पक्षाची चोख बाजू ते मांडत असतात. यापुर्वी सुद्धा प्रवक्ता पदाची जबाबदारी प्रकाश बिनेदार यांनी चोखपने पार पाडलेली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्यावर प्रवक्तापदा ची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्ती बद्दल महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, सभापती तसेच नगरसेवकांनी बिनेदार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.