निलेश मोरे
मुंबई :- अनाथांची माई ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ , माजी महापौर स्नेहल आंबेकर , वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिनी बोधनवाला , प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर , स्पीच थेरॅपिस्ट सोनाली लोहार , मिसेस महाराष्ट्र रंजिता शर्मा , सामनाच्या पत्रकार हेमलता वाडकर आदी विविध क्षेत्रांत आपलं कर्तृत्व आणि ठसा उमटवणाऱ्या महिलाना पॉवर ऑफ वुमन पुरस्कार 2018 ने सन्मानित करण्यात येणार आहे .
रविवार 22 एप्रिल रोजी सांय 4 ते 7 वा ठाणे गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 7 निवडक महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . ऑल्वेज हेलपिंग हॅन्ड आणि आर्ट इन फेशनच्या संपादिका सारिका कदम यांनी या पुरस्काराचे आयोजन केले आहे . यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक उदय साटम यांच्या मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे . आज अनेक महिला आपलं स्वतःच स्थान बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत . पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला घर सांभाळून क्षेत्रांत कार्य करत आहेत . अशा महिलांना पुरस्कार ही त्यांच्या कर्तुत्वाला दिलेली सलामी असून इतर महिलांना देखील यांच्यापासून प्रोत्साहन मिळावं यासाठी दरवर्षी पॉवर ऑफ वुमन पुरस्कार देऊन महिलांना सन्मानित केले जाणार आहे असे कार्यक्रमाच्या आयोजिका सारिका कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले .