दीपक देशमुख
नवी मुंबई :स्वच्छता अभियान आनंतर्गत मनपाच्या हद्दीत उपलब्ध असणाऱ्या शौचालयात विनामूल्य नैसर्गिक विधी करण्याची मुभा असतानाही बहुतांशी शौचालय चालक नियमबाह्य पैसे उकळत आहेत.तसेच काही शौचालय चालकानी पाणी विकण्याचा गोरख धंदा सुरू केला असून अश्या शौचालय चालकांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वधर्मसमभाव मित्र मंडळाचे संस्थापक संतोष सैदाने यांनी केली आहे. दरम्यान अश्याच प्रकारची मागणी घणसोली येथील विकास संस्थेनेही केली आहे.
नवी मुंबई परिसरात सध्या एकूण सहाशे सार्वजनिक शौचालय आहेत.ही सर्व शौचालयाची देखभाल विविध सामाजिक संस्था करत आहेत. याठिकाणी बाहेरून आलेले नागरिक तसेच ज्याच्या घरात शौचालय नाहीत असे नागरिक ह्या शौचालयात नैसर्गिक विधी साठी जात असतात.स्वच्छता अभियान सुरू झाल्या पासून मनपा हागणदारी मुक्त व्हावी म्हणून ही शौचालय विनामूल्य केली आहेत.परंतु मनपाच्या हद्दीतील शौचालय चालक आजही 2 ते पाच रुपये वसुली करत असल्याचे विकास संस्थेचे म्हणणे आहे.
मनपा परिसरातील वाशी,ऐरोली, कोपरखैरणे,नेरुळ,बेलापूर आदी ठिकानातील बस स्थानक,रेल्वे स्थानक,बाजार पेठा आदी परिसरातील शौचालय चालक आजही मनपाने ठरवून दिलेल्या एक रुपये ऐवजी पाच रुपये नियमबाह्य वसुली करत आहेत.विशेष म्हणजे याबाबत घनकचरा विभागाला तक्रारी जाऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नियमबाह्य वसुली करणाऱ्या शौचालय चालकांची ताकद वाढली आसल्याचे सर्वधर्मसमभाव मित्र मंडळाचे संस्थापक संतोष सैदाने यांनी सांगितले.
नेरुळ सेक्टर 3,बस स्थानक लगत असणाऱ्या शौचालयात नैसर्गिक विधी साठी आलेल्या नागरिका कडून तर पाच रुपये दर बिनधास्तपणे स्वीकारत आहेत.विशेष म्हणजे येथील शौचालय चालक 15 लिटरचा ड्रम 5 रुपये दराने नियमबाह्य विकत असल्याचेही संतोष सैदाने यांनी सांगितले.हे शौचालय इंटरनॅशनल सामाजिक संस्थेला दिला आहे.
घणसोली परिसरातही यापेक्षा कोणतीही वेगळी परिस्थिती नाही. या ठिकाणी हिंदी भाषिक नागरिकांना शौचालय चालवण्यासाठी दिले आहेत.हे शौचालय चालक ही कुणालाही न घाबरता दोन रुपये दर आकारात आहेत.त्यामुळे अश्या शौचालय चालकांवर कारवाई करावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांना दिलेल्या पत्रात विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.त्यामुळे अश्या शौचालय चालकांवर कारवाई करण्याची गरज भासू लागली असल्याचे नागरिक तुषार भालेकर यांनी सांगितले.
यासंदर्भात मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे यांना विचारले असतात त्यांनी सांगितले की,याबाबतब चौकशी करून उपायुक्तांना सादर करून कारवाई करू असे सांगितले.