दीपक देशमुख
नवी मुंबई : अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या मनपाच्या आरोग्य सेवेचा बोजवारा गेल्या सहा महिन्या पासून उडाला असून मूलभूत औषधही येथे मिळत नाहीत. त्यामुले गरजू व गरीब रुग्णांना भयानक त्रास होत आहे.एकीकडे मनपा वैद्यकीय अधिकारी मूलभूत औषधाचा पुरवठा झाला असे म्हणत असताना मग ही औषधे गेली कुठे?असा सवाल व्यक्त करून त्याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक मनोज हळदणकर यांनी केली आहे. दरम्यान दोन दिवसा पूर्वी एका तरुणाला श्वसनाचा त्रास झाला होता .त्यावेळी त्याला वाशी येथील मनपा रुग्णालयात दाखल केल्या नंतर मूलभूत औषधही नसल्याचा पर्दाफास झाला.
वाशी येथे मनपाचे 300 खाटाचे सुसज्ज असे रुग्णालय आहे. या ठिकाणी मनपाच्या हद्दीतील शेकडो गरीब व गरजू रुग्ण येथे उपचार व दाखल होण्यासाठी येत असतात.परंतु जीवनावश्यक औषध उपचार म्हणजे अँटिबायोटिक औषध ,अँटिबायोटिक इंजेक्शन,वाफ द्यावयाचे औषध, चिकन पट्टी, ब्लेड, हात मौजे,टाके टाकायचे धागे उपलब्ध नसल्याने आर्थिक दुर्बल व गरजू रुग्णांना सहा महिन्या पासून विकत आणावे लागत आहे.येथे येणारे रुग्ण हे आर्थिक कमकुवत असल्याने हे साहित्य कसे आणायचे असा प्रश्न त्यांना नेहमीच पडत आसल्याचे नगरसेवक हळदणकर यांचे म्हणणे आहे.
तसेच नेहमीच येथील महत्वाच्या होणाऱ्या रक्त चाचण्या करायच्या यंत्र सामुग्री यंत्रणा बंद असल्याने व रक्त चाचण्या करायच्या औषध सामग्री वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी ठिकाणाहून करावे लागत असल्याने गरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचेही नगरसेवक हळदणकर यांनी सांगितले.
मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दयानंद कटके हे अत्यावश्यक औषधांचा पुरवठा व्यवस्थित आसल्याचे सांगत असताना रुग्णालयात औषध मिळत नाहीत.यामागे गौडबंगाल काय आहे ?तसेच औषधांचा पुरवठा झाला असताना मग हि औषधे गेली कुठे ?याची चौकशी करावी अशी मागणी नगरसेवक मनोज हलदनकर यांनी केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी सागर ढोणे नामक रुग्ण वाशी येथील इमरजेनसी वॉर्ड मध्ये दाखल झाला.त्याला दाखल केल्या नंतर एकही औषध उपलब्ध नसल्याने त्याची आई लता ढोणे यांनी ती एक हाजाराची औषध खाजगी औषध दुकानांतून आणली असल्याचेही नगरसेवक हळदणकर यांनी सांगितले.अश्या घटना नियमित घडत असून एक स्थानिक वृत्तपत्राच्याही संपादकाला डोक्याला टाके घालण्यासाठी गेल्यानंतर धागा नसल्याने आल्याचेही वास्तव येथे घडल्याचे वास्तव आहे.त्यामुळे पुरवठा झालेली औषध जातात तरी कुठे याचा शोध घेणे गरजेचे असल्याची मागणी खुद्द रुग्णाकडून होत आहे.
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.