नवी मुंबई :- वाॅर्ड क्रं. १०० मध्ये स्थानिक नगरसेवक तथा सभागृह नेता रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विवीध कामांचा शुभारंभ लोकनेते गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार, संजीव नाईक, सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाध्यक्षा सौ.माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, स्थायी सभापती सौ. शुभांगी पाटील, नगरसेवक डाॅ.जयाजी नाथ, परिवहन सभापती प्रदीप गवस, महिला व बालकल्याण सभापती सौ.शिल्पा कांबळी, ब प्रभाग अध्यक्षा सौ.रूपाली भगत, विधी सभापती गणेश म्हात्रे, क्रिडा व सांस्कृतीक सभापती विशाल डोळस, यशवंतराव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका सौ.तनुजा मढवी, नगरसेविका सौ.शशीकला पाटील, नगरसेविका सौ.वैशाली बो-हाडे, नगरसेविका कविता आगोंडे, तालुकाध्यक्ष सुरेश शेट्टी, चंद्रकांत आगोंडे, बाबासाहेब राजळे, संभाजी यादव, कमलेश नांगरे, प्रभाग सदस्य अफसर इमाम, बिपीन झव्हेरी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
याप्रसंगी वाॅर्डमधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण,मदर तेरेसा उद्द्यानाचे नुतनीकरण,उरणफाटा व इतर अंडरपासच्या कामांची दुरूस्ती,आर.आर.पाटील उद्द्यानात मध्ये शौचालय, विवीध ठिकाणी बेंचेस बसविणे,सर्व ग्रीलची व रेलींगची रंगरंगोटी,सर्व गटारांची दुरूस्ती या कामांचा शुभारंभ व भिमाशंकर सोसायटीसाठी ऊभारलेल्या कंपोस्ट पीटचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी लोकनेते गणेश नाईक यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात नागरी कामांची सुरूवात रविंद्र इथापे यांच्या माध्यमातुन होतेय त्याबद्दल कौतुक व्यक्त केले. या वाॅर्डमध्ये वंडर्स पार्क, कै.आर.आर.पाटील उद्द्यान,मदर तेरेसा उद्द्यान अशी उद्द्याने आहेत. नाल्याचे देखील काम झालेले आहे आणि राहिलेली सर्व कामे आज सुरू होत आहेत म्हणुन वाॅर्ड क्रं.१०० हा नवी मुंबईमधील एक आदर्शवत असणारा नं.१ चा वाॅर्ड आहे याचे श्रेय नगरसेवक रविंद्र इथापे यांना दिलेच पाहिजे. महानगरपालिकेत सभागृहात शब्दांची रचनात्मक जोडफोड करून विरोधकांना जशास तसे उत्तर देणारा अशी त्यांची ख्याती आहे म्हणुनच सर्वात महत्वाचे सभागृह नेतेपद आम्ही त्यांना दिले आहे.असे गौरवउदगार श्री.गणेश नाईक यांनी काढले.
महापौर जयवंत सुतार यांनी वाॅर्ड व नवी मुंबईतील समंस्यांचा ऊहापोह घेतला. न दिसणारी कामे रविंद्र इथापे यांनी या प्रभागात केली असुन कार्यक्रम घेतला की आणखी कितीतरी कामे ते पदरात पाडुन घेणार आणि दादा त्याना ती देणार अशी परंपराच झाली असुन भविष्यात त्यांनी वंडर्स पार्कमध्ये म्युझीकल फाऊंटन व सायन्स पार्क झाले पाहिजे. भिमाशंकर बाहेर म्हणजेच याच कार्यक्रमस्थळी खेळाचे मैदान व बाजुला ऊद्दयान झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे व ती आम्ही पुर्ण करणार म्हणुनच वाॅर्डमधील जनतेने त्यांच्याबरोबर कायम स्वरूपी रहावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार यांनी केले.
सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक रविंद्र इथापे यांनी वर्षभरात झालेल्या संपुर्ण कामाचा आढावा घेतला. आपण ही कामे रहिवाश्यांच्या मागणीनुसार करत असतो. उरणफाट्यापासुन जेएनपीटीला जाणारा दहापदरी रस्ता आता याच रस्त्यावर उड्डाणपुलाद्वारे होणार आहे. कारण हा रस्ता जर झाला असता तर सर्व्हीस रोडदेखील राहिला नसता व आमच्या निलसिध्दी,हर्बर व्ह्यु व समोरच्या एकता विहार,निलगिरी गार्डन,इनकम टॅक्स काॅलणी ह्या सर्व सोसायट्या रस्त्यावर आल्या असत्या त्यामुळे संभाव्य धोका टळल्याचे रविंद्र इथापे यांनी सांगितले.