दीपक देशमुख
नवी मुंबई : कसारा घाटात अपघातग्रस्त झालेल्या ट्रक चालकाला नवी मुंबई भाजप पदाधिकार्यांनी गुरुवारी रात्री आकाराच्या सुमारास मृत्यूच्या दाढेतून बालबाल वाचवले.यामुळे या पदाधिकार्यार्ंवर नवी मुंबई परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुरुवारी रात्री आकाराच्या सुमारास लोखंडी बिंम भरलेला ट्रक अपघातग्रस्त झाला होता. ट्रकमध्ये एक टनाच्या आसपास वजन असणारे बिम चालकाच्या ड्रायव्हर केबिन मध्ये घुसले होते. त्यामुळे चालक नवरुद्दीन याचे दोन्ही पाय अडकले होते. त्यामुळे ट्रक चालक नवरुद्दीन अल्ला अल्ला बचाव अशा जिवाच्या आकातांने रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांकडे मदतीकरिता हाका मारत होता. परंतु त्याच्याकडे कोणतेही वाहन चालक लक्ष देत नव्हते. याच वेळी भाजप नवी मुंबई युवा मोर्चांचे महामंत्री हरीश पांडेय हे मध्यप्रदेश वरून आपले काम उरकून कसारा घाटातुन जात होते. त्यांचे लक्ष अपघातग्रस्त ट्रककडे गेले. त्यात चालक नवरुद्दीन बचाव बचाव बोलत असल्याने हरीश पांडेय यांनी क्षणाचाही वाट न पाहता आपली कार थांबवली व इतरही मुंबईच्या दिशेने जाणारी चार वाहने थांबवून त्या चालकांना पांडेय यांनी मदतीची मागणी केली. त्यानंतर त्या सर्वानी एकत्र येऊन चालक नवरुद्दीन याचे अडकलेले पाय बीम हटवून मोकळे केले. त्यानंतर उपस्थित असणार्या एक नागरिकांनी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून आधीच रूग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. एवढ्या रात्री डोंगरदारी परिसरात शक्यतो कुणीही वाहन चालक थांबत नाही. परंतु श्रीराम भक्त असणार्या हरीश पांडेय यांनी आपली माणुसकी दाखवून अल्ला भक्त असणार्या नावरुद्दीनचे जीव वाचवले. यामुळे हिंदू व मुस्लिम या दोन धर्मामध्ये असलेली दरी नक्कीच भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.हरिश पांडेय यांच्या तत्परतेने समयसूचकतेमुळे अपघातातील एका जखमीकला नव्याने जीवन मिळाले आहे.