पनवेल :- संघर्ष समितीच्या रेट्यामुळे पनवेल शहरातील गुटखा विक्रेते आणि दलालांचे कंबरडे मोडले आहे. आज अन्न व औषध प्रशासनाने शहरातील टपाल नाका येथे छापा घालून 1 लाख 33 हजारांचा पान मसाला हस्तगत केला.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब समुद्रे, प्रशांत पवार आदींनी सहाय्यक आयुक्त दिलीप सांगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
टपाल नाका येथील रतन मार्केटमधील दलाल पंचमुखी ट्रेडर्सच्या गोदामावर ही कारवाई करण्यात आली.
पनवेल संघर्ष समितीने पनवेल आणि रायगड गुटखा मुक्तीचा संकल्प केला असून तो संकल्पपूर्तीकडे वाटचाल करीत असल्याची माहिती समितीचे सचिव चंद्रकांत शिर्के आणि उज्वल पाटील यांनी दिली.