दीपक देशमुख
नवी मुंबई : मनपाच्या हद्दीत डेब्रिज माफिया डेब्रिज टाकतात म्हणून आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन 24 तास उलटले नाही तोच घणसोली येथील एका शाळेच्या पाठीमागील .त्यामुळे प्रशासंनप्रती नागरिकांत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
घणसोली गावात शेतकरी शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाची सेमी मराठी व मराठी माध्यमाची शाळा आहे.यशाळेच्या पाठीमागे वन विभागाचा मोकळा भूखंड आहे.याठिकाणी गेल्या सहा महिन्या पासून सुमारे 1500 ट्रक,ढम्पर व लहान टेम्पोद्वारे डेब्रिज कुणालाही न भिता टाकले जात आहे.
मनपा परिसरात डेब्रिज मुळे अवकळा येते व पावसाळ्यात पाणी घराघरात जाऊ शकते यावर प्रतिबंध यावे म्हणून डेब्रिज विरोधी पथक,दोन नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. डेब्रिज विरोधी पथक चोवीस तास कार्यावर असतानाही मनपा परिसरात रोजच डेब्रिज टाकले जात आहे.तसेच शेतकरी शिक्षण शाळेच्या पाठीमागे तर मोठे डोंगरच निर्माण झाले आहेत.त्यामुळे घणसोली मधील नागरिका मध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे.यावर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधीक्षक मनोहर गांगुर्डे यांना विचारले असता,डेब्रिजचा चौकशी करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.