नवी मुंबई -: कामोठे शहरातील सिडकोच्या अनेक भुखंडांवर कचऱ्यांचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सिडकोने अशा भूखंडांवर तातडीने कुंपण घळवस अशी मागणी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे लकीत सोडवले यांनी केली आहे. सध्या नवी मुंबईनंतर सिडकोचे सर्वधिक भूखंड कामोठे, खारघर व न्यू पनवेल येथे आहेत.मात्र अशा उघड्या भुखंडांवर डेब्रिज,कचरा किंवा नैसर्गिक विधी केले जात आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण।होण्याची शक्यता आहे. काही भूखंड हे रहिवाशी विभागांत असल्याने तेथील रहिवाशांना घाणीचा सामना करावा लागतो.याधीच पनवेलचा कचरा प्रश्न पेटलेला आहे. त्यामुळे कचरा तसाच पडून
राहण्याची शक्यता आहे.
येत्या दीड महिन्यांत पावसाळा सुरू होणार असून या घाणीमुळे दुर्गंधी व रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा भुखंडांवर तातडीने तारेचे कुंपण घालून अशा गैर गोष्टींना आळा घालावा अशी मागणी सेनेचे सोडेवाले यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. यावेळी तालुका शहर संघटक रेवती सकपाळ, कामोठे संघटक मीना सादरे,शिव सहकार सेनेचे देवानंद पाचपुते तसेच सुनील जुवाटकर, सदानंद साळुंखे, समीर पवार उपस्थित होते.