दीपक देशमुख़
नवी मुंबई : मनपाच्या हद्दीत मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्यामुले आयुक्तांनी डेब्रिज प्रतिबंध करणाऱ्या तेरा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या.परंतु ह्या करणे दाखवा नोटीस विशीस्ट काळातीलच अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बजाविल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.कारणे दाखवा नोटीसा मागील दोन वर्ष्यापूर्वी पासून कार्यरत असणाऱ्या सरसकट अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिल्या असत्यातर सर्वांवरच कारवाई योग्य झाली असती अशी मागणी होत आहे.त्यामुळे तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एकप्रकारे अन्यायच होत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान डेब्रिज टाकण्यास सुरक्षा रक्षक व चालकाच कारणीभूत आहेत असे मानून त्यांनाच घरी बसविल्याने त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.
मनपाच्या हद्दीत गेल्या दोन वर्ष्या पासून डेब्रिजचा राक्षस उभा राहिला आहे.याच्या तक्रारी व वर्तमान पत्रांनी केलेला पाठ पुरावा केल्या नंतर आयुक्त एन.रामस्वामी यांनी तीन दिवसा पूर्वी 1 नोव्हेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 दरम्यान कार्यरत असणाऱ्या डेब्रिज विरोधी भरारी पथकातील आठ पथक प्रमुख,बेलापूर,नेरुळ व घणसोली विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी व परिमंडळ 1 व 2 चे नियंत्रण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.तसेच आपला अहवाल दोन दिवसात मिळाला नाहीत तर आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू असा सज्जड दमच कारणे दाखवा नोटीशी मध्ये आयुक्त एन.रामस्वामी यांनी दिला आहे.त्यामुळें नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान कार्यावर असणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मागील तीन महिन्यात डेब्रिज विरोधी पथकात कार्यरत आसणार्यांनाच करणे दाखवा नोटीस न देता मागील दोन वर्ष्यापूर्वी पासून डेब्रिज प्रतिबंध करणाऱ्या सर्वानाच कारणे दाखवा नोटीस दिली तर सर्वसमावेशक कारवाई होईल असे पालिका सूत्रांनी सांगितले. मागील दोन वर्ष्यात अनेक पथकप्रमुखांनी आपापली ताकद लावून नियोजित तीन महिन्यांच्या काळाऐवजी सहा सहा माहिण्याचाही कालावधी जॅक लावून केल्याची माहिती पालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नोव्हेंबर 17 ते फेब्रुवारी 18 ह्या कालावधीतच कार्यरत आसणार्यांनाच त्रास का असाही सवाल व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे मे 2017 मध्ये घनसोलीतील सद्गुरू रुग्णालयाच्या पाठीमागील झाडी मध्ये काही समाजसेवी वृत्तीच्या तरुणांनी ढम्पर द्वारे डेब्रिज टाकले जात आहे.अशी तक्रार केल्या नंतर सहाययक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी एक ढम्पर पकडला . ढम्पर पकडल्या नंतर जप्तीची कारवाई कारवाई करणे गरजेचे असतानाही सहाययक आयुक्त नागरे यांनी त्या ढम्परच्या टायरची हावा काढण्याच्या व्यतिरिक्त काहीही केले नाही.त्यानंतर तो ढम्पर संबंधित मालकांनी रात्री नऊ वाजता घेऊन गेला.त्यानंतर त्याविषयी विविध वर्तमानपत्रात बातम्याही आल्या. परंतु सहाययक आयुक्त नागरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.त्यामुळेच पालिका अधिकाऱ्यांची ताकद वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
साधारणतः चार महिन्यांपूर्वी डेब्रिज टाकण्यास डेब्रिज माफियांना कार्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षक व चालक माहिती देतात असा चुकीचा व खोटा अहवाल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांना पथक प्रमुखांनी दिल्यामुळे चार चालक व 14 सुरक्षा रक्षकांना कामावर कमी केले होते.विशेष म्हणजे ते सोळा कर्मचारी आजही घरीच विना काम बसून आहेत.महत्वाचे म्हणजे त्यांचा तीन महिन्यांचा वेतनही ठेकेदारांनी आदा केला नाही.त्यामुळें त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू कर्मचाऱ्यांवर कोणीही अधिकारी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून बळीचा बकरा बनवतो असे म्हणण्याची पाळी आली आहे.