दीपक देशमुख
नवी मुंबई : घणसोलीगाव, साई सदानंद नगर मधील अपूर्ण असलेल गटार मनपा प्रशासनाने योग्य प्रकारे लक्ष देऊन पूर्ण केल्याने नागरिकामध्ये आनंद व्यक्त होत आहे. या अर्धवट गटारामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
साई सदानंद नगर येथे मनपाच्या वतीने एक नवीन गटाराची निर्मिती करण्यात आली होती. गटाराची निर्मिती करताना संबंधित ठेकेदाराने जुने गटर व नवीन गटराचा मिलाप केला नव्हता. ज्या ठिकाणी दोन्ही गटाराचे एकत्रीकरण केले नव्हते, त्या ठिकाणी स्थानिक महिला आपले रोजचे स्वंयपाकातील खरखाट, उरलेले अन्न त्या ठिकाणी टाकत असत. त्यामुळे तिथे दुर्गंधीयुक्त वतावरणाबरोबरच उंदीर, घुशीचे सुळसुळाट झाला होता. यामुळे गटारालगत रहिवाशी असणार्या नागरिकांना याचा भयानक त्रास होत होता. शेवटी येथील स्थानिक रहिवाशी किशोर देशमुख, दत्तात्रेय कोल्हे या स्थानिक रहिवाशांनी उपअभियंता वसंत पडघन व शाखा अभियंता समीर ठाकरे यांच्याकडे आपली समस्या मांडली. उपअभियंता पडघन व शाखा अभियंता ठाकरे यांची दखल घेऊन अपूर्ण गटाराचे काम सुरू केले व हे काम पूर्णत्वास नेल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.