स्वयंम न्युज ब्युरो :- 9619197444
पनवेल :- पनवेल महापालिकेच्या उपमहापौर चारुशीला घरत यांचे वडील शंकर राघो पाटील यांचे नुकताच वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
शंकर पाटील यांनी मुंबई पोर्टमध्ये नोकरी केली असून ते १९९५ साली सेवानिवृत्त झाले होते. आपल्या या सेवेकाळामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी पोर्टमध्ये सेवा केली. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले. शंकर पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. शंकर पाटील यांचा दशक्रिया विधी ०६ मे रोजी श्रीक्षेत्र नाशिक येथे तर उत्तरकार्य ११ मे रोजी शहाबाज(अलिबाग) येथील निवासस्थानी होणार आहे.