• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2018

मुख्यमंत्री आणि भाजप टोळी युध्दाप्रमाणे निवडणुका लढवत आहेतः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री आणि भाजप टोळी युध्दाप्रमाणे निवडणुका लढवत आहेतः  खा. अशोक चव्हाण

निवडणुक आयोगाने मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई कारावी

मुंबई : –  मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ टेपमुळे भाजपच्या पारदर्शकपणाचा बुरखा गळून पडला असून सत्तापिपासू भाजपचा ओंगळवाणा आणि विकृत चेहरा जनतेसमोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनीही ही ऑडिओ क्लिप त्यांचीच असल्याचे मान्य केले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.  

मुंबई येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री आणि भाजप टोळी युध्दाप्रमाणे निवडणुका लढवत आहेत. भाजपने राजकारणाचे माफियाकरण केले आहे हे दिसून येते. राज्याच्या प्रमुखाने साम, दाम, दंड भेदाची भाषा करणे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. निवडणुक आयोगाने याप्रकरणाची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून कारवाई करावी. उध्दव ठाकरे जर खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. भाजप किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी कोणीतरी खोटं बोलत आहे. याप्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे. काळा पैसा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून भाजप निवडणुक लढवित आहे. पालघरमध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा भाजपचा प्रचार करीत आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाने यापूर्वीच तक्रा केली आहे पण दुर्देवाने निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. उद्या काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात पालघर लोकसभा पोटनिवडणुक निर्णय अधिका-याकडे करणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी सरकारच्या आपयशी कारकिर्दीची पोलखोल करणारी जुमला किंग नावाची सिरीज प्रदेश काँग्रेसच्य सोशल मिडीया विभागाने तयार केली आहे. या सिरीजचे प्रकाशन अभिषेक मनु सिंघवी आणि खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ, पृथ्वीराज साठे, सचिव जिशान अहमद उपस्थित होते. 

Previous Post

नवी मुंबई न्यायालायासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश व ज्येष्ठ न्यायाधीश नियुक्ती तसेच निधी मंजुरीसाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाई करा

Next Post
मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाई करा

मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाई करा

मोदी सरकारची चार वर्ष विश्वासघाताची: डॉ. अभिषेक मनु सिंघवी

मोदी सरकारची चार वर्ष विश्वासघाताची: डॉ. अभिषेक मनु सिंघवी

मृत मुलाच्या कुटूंबियांना भरपाई न मिळाल्यास भाजपचा उपोषणाचा इशारा

मृत मुलाच्या कुटूंबियांना भरपाई न मिळाल्यास भाजपचा उपोषणाचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com