मुंबई :- आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना पेन्शन देऊन सरकार त्यांना जणू स्वातंत्र्यसैनिक ठरवू पाहते आहे. सरकारच्या एखाद्या निर्णयाविरूद्ध रोष प्रकट केला म्हणून संबंधितांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे पेन्शन दिली जात असेल तर हा स्वातंत्र्यसेनानींचा अवमान असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
यासंदर्भातील सरकारच्या निर्णयावर विखे पाटील यांनी सडकून टीका केली आहे. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाही. त्यामुळे या माध्यमातून चळवळीशी संबंध जोडून खोटा इतिहास रचण्याचा हा आणखी एक व्यर्थ खटाटोप आहे. देशासाठी आम्हीही खुप काही केले, असे दाखविण्याचा हा केविलवाणा अट्टाहास असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.