नवी मुंबई:- वन है तो जल है, और जल है तो कल है चा संदेश देत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सेक्टर-15 सीबीडी बेलापूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम 13.06.2018 रोजी पार पडला. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि त्याचे जतन करत, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून स्वतः सोबतच समाजाचेही रक्षण करण्याचे तसेच वृक्ष क्रांतीची हि मोहीम निरंतरपणे सुरु ठेवण्याचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले. यावेळी नगरसेवक दीपक पवार, दर्शन भारद्वाज,दिपाली घोलप, शैलजा पाटील, गोविंद करनानी, आरती राउळ, अलका कामत, शीतल जगदाळे, संजय ओबेरॉय उपस्थित होते.यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे जतन केले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून स्वतः सोबतच समाजाचेही रक्षणकरण्याचा तसेच वृक्ष क्रांतीची हि मोहीम निरंतरपणे सुरु ठेवण्याचा दृढ संकल्प आपण सर्वांनी केले पाहिजे. तसेच सध्या जागतिक तापमानात होत असलेली वाढ, अनियमित पर्जन्यमान आणि वातावरणात होत असलेले बदल या सर्वांचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा महत्वाचा पर्याय असल्याचे लक्षात घेऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावून पर्यावरणाचा विनाश होण्यापासून वाचवावे. जर झाडेच नसतील तर आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते ते कुठून मिळेल ? आपले मानवी जीवन धोक्यात येईल म्हणून आपण सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण करून पशु, पक्षी, मानवी जीवनाचे जीव वाचवायला हवे. तुम्ही आम्ही सर्व जण मिळून एक तरी झाड लावून वृक्षारोपणानंतर संरक्षण, पाणी पुरवठा, संगोपन आणि देखभाल या सर्वांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, असे बेलापूरच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते.