दीपक देशमुख
नवी मुंबई :घणसोली सेक्टर एक परिसरातील सोसायट्यांच्या मधील रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचत आहे.त्यामुळे भविष्यात पाणी साचून मच्छरांची पैदास होऊन नागरिक आजारी पाडण्याची शक्यता आहे.त्यामुळे ह्या रस्त्यांचा विकास करावा अशी मागणी फ प्रभाग समिती सदस्य प्रमोद कदम यांनी केली आहे.
घणसोली सेक्टर एक मधील दत्त कृपा सोसायटी, साई लीला सोसायटी व दत्तगुरु सोसायटी शेजारी नागरिकांना येण्या व जाण्यासाठी असणार्या रस्त्याचे विकास पावसाळा सुरू झाला तरी केला नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. म्हणून फ प्रभाग समितीचे सदस्य प्रमोद कदम, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण चारी, भाजपचे जिल्हा सचिव बिपीन तायडे,आप्पा चिकने तसेच नागरिकांनी पाहणी केली.
सध्या सोसायटीच्या शेजारी असणार्या रस्त्यावरून वाहन मोठ्या प्रमाणात जात आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहेत. परंतु रस्त्यावर पाणी साचल्यामुळे डेंग्यू, मलेरिया जातीचे मच्छरांची पैदास होऊ शकते. त्यामुळे किमान सध्या डागडुजी करून रस्त्याचा विकास करावा अशी मागणी प्रमोद कदम यांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी मनपाच्या वतीने घणसोली परिसरातील अनेक रस्त्याची डागडुजी केली.परंतु यासोसायट्यांच्या रस्त्याची डागडुजी का केली नाही?असा सवालही फ प्रभाग समितीचे सदस्य कदम यांनी केला आहे.
याबाबत उपअभियंता वसंत पडघन यांना विचारले असता,त्या रस्त्याचे काम त्वरित करतो असे सांगितले.