दीपक देशमुख
नवी मुंबई : ऐरोलीतील सरस्वती विद्यालयाच्या सेमी इंग्रजी विभागातील विद्यार्थिनी सुचर्या देशमुख हिने माध्यमिक विभागात ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तर तिचा भाऊ सूचित देशमुख यांनीही उच्च माध्यमिक विज्ञान विभागात घवघवीत यश प्राप्त केले.यामुळे या बहीण भावाचे विशेष अभिनंदन होत आहे.
२०१७/१८ या शैक्षणिक वर्षात सरस्वती विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी ठरलेल्या सुचर्या हिने सर्वच विषयात ९० गुणांपेक्षा जास्त मिळवल्याने तिने १०वीच्या १११ विद्यार्थ्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
सूचित देशमुख याने २०१५/१६ याशैक्षणिक वर्ष्यात सरस्वती विद्यालयात माध्यमिक विभागात ९२ टक्केगुण प्राप्त केले होते.त्यांनी पुढील उच्च माध्यमिक शिक्षण मुलुंड येथील वाणी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान विभागात घेतले. नुकत्याच लागलेल्या उच्च माध्यमिक विभागात सूचीत यांनीही ८२ टक्के गुण मिळवले.त्यामुळे त्याचेही अभिनंदन होत आहे.विशेष म्हणजे हे दोन्हीही भावंडे सरस्वती विद्यालयात अध्यापक असलेल्या सुरेश देशमुख यांची अपत्य आहेत.या दोघांच्या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघ, साईलीला प्रतिष्ठान, संजय अंकल सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या वतीने अभिनंदन केले आहे.