लोकल खोळंबल्या, वाहतुकही मंदावली
मुंबई :- मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला असून मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने मुंबईतील रेल्वे सेवाविस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु होत्या.
केरळमध्ये २९ मे रोजी पोहोचलेला मोसमी पाऊस ८ जून रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचला. मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी हवामान सध्या अनुकूल असून शनिवारी मोसमी पाऊस मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये दाखलझाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राज्यातील उर्वरित भागांमध्ये सोमवारपर्यंत मोसमी वारे पोहोचतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी रात्रभर झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिरानेसुरु असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. पुढील २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, असे हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. रात्रभर झालेल्या पावसाचाफटका विमान सेवेलाही बसला. मुंबईत येणार्या दोन विमानांचे मार्ग खराब हवामानामुळे बदलण्यात, असे समजते. रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणी साचले. यामुळे रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली.
मुंबईसह ठाणे उपनगरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत सोसाट्याच्या वार्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनवर परिणाम झाला असून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावलीआहे. शुक्रवारी(८ जून) रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे शनिवारी(९ जून) सकाळी मुंबईहून सुटलेली पहिली कसारा लोकल कुर्ला स्थानकात थांबवण्यातआली. त्यानंतरच्या खोपोलीपासून सर्व गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईसह उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या भागात मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. तर, ठाण्यातदेखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्यातील रेल्वे स्थानकातील रुळपाण्याखाली गेला आहे.
मुंबई, उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह राज्याच्या विविध भागांत शनिवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत उपनगरे आणि दक्षिण मुंबईत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. सकाळी झालेल्या अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसामुळे दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कलसह सायन, चुनाभट्टी आणि सायन परिसरात गुडघाभर पाणी तुंबले आहे. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. माटुंगा ते कुर्ला दरम्यान रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने लोकलचा प्रचंड खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे ४० मिनिटे आणि पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, ८ ते १२ जूनपर्यंतमुंबईसह उपनगरांत अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत रात्रभर मुलुंड आणि भांडुप परिसरात सर्वाधिक पाऊस पडला. तर अंधेरी, वांद्रे, कांजुरमार्ग आणि पवईमध्येही जोरदार बरसला. कांजुरमार्ग येथे रुळावर झाड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. विक्रोळी येथेअभियांत्रिकी काम सुरू असल्याने मध्य रेल्वेवरच्या धीम्या लोकल जलदगती मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. शिवाय मध्य रेल्वेने अनेक लोकल्स रद्द केल्याने सर्वसामान्य मुंबईकर आणि चाकरमानी यांना दैनंदिन कामकाज करणे अवघड झाले आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा प्रचंड जोर असल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. हिंदमाता, कुर्ला, चेंबूर आणि किंग्ज सर्कल आदी भागात गुडघ्या एवढे पाणी साचले आहे. त्यामुळे दादर ते सायनपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्यानेमुंबईवरून पनेवल आणि पनवेलवरून मुंबईकडे येणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर १२जूनपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टीचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, या सार्या गोष्टींमध्ये एका गोष्टीने सार्यांचेच लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे भायखळा पोलीस ठाणे. या पावसाचा जोर इतका होता की पावसामुळे भायखळा पोलीस ठाण्यात आतमध्ये पाणी भरले. तसेच, पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातही पाणीभरले. मात्र, त्यावर तातडीनमे काहीच उपाययोजना करणे शक्य नसल्याने पोलीस अधिकार्यांनी त्याच पाण्यात आपले काम सुरु ठेवले. तसेच. विविध कारणांसाठी आलेल्या नागरिकांनीही याच पाण्यातून आपली वाट तुडवली.
सायन-कुर्ला मार्गावर पाणी साठल्याने मुंबई-दादरहून निघालेल्या लोकल डाऊनमार्गे कासवगतीने धावल्या, घाटकोपर-ठाण्यापर्यंत गाड्यांचा वेग मंदावलेला होता. लोकल गाड्या रद्द होणे, वेग मंदावणे यामुळे दुपारनंतर घरी परतणा-याचा करमान्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेत प्रवाशांनी दुपारनंतर तातडीने घरी परतण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेही दुपारच्या वेळेत गर्दी झाली होती. सकाळी मुंबईला काही लोकल नपोहोचल्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळापत्रकावर झाला. रात्रीपर्यंत दोन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा वेळेनूसार धावत होती. या गोंधळामुळे लांबपल्याला जाणा-या गाड्यांच्यावेळापत्रक फारसे प्रभावित झाले नाही. अप-डाऊन मार्गावर गाड्या शनिवारी वेळेत धावल्याने त्या गाड्यांनी जाणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला.
** पावसामुळे काय घडले
१) खराब हवामानाचा फटका विमान सेवेलाही बसला. मुंबईत येणार्या दोन विमानांचे मार्ग बदलण्यात आले.
२) अंधेरीतील जुहू लेन येथे झाड पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत, कोणीही जखमी नाही.
३) पावसामुळे सीप्झ ते ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी