अमोल इंगळे
नवी मुंबई : संततधार पावसात सारसोळे गाव गटारे तुंबल्याने व मल:निस्सारणच्या वाहिन्या फुटल्याने रस्त्यावर तसेच निवासी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गटारांची व मल:निस्सारणच्या वाहिन्यांची ठेकेदारांनी वेळीच सफाई न केल्याने आणि गटारे, मल:निस्सारण वाहिन्या सफाई ठेकेदारांवर महापालिका प्रशासनाचे कोणतेही नियत्रंण नसल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांना व त्या ठिकाणी राहणार्या नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गटारे व मल:निस्सारणची सफाई करणार्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
दोन दिवसापासून संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस सुरू असल्याने महापालिका प्रशासनाने गटर व मल:निस्सारण वाहिन्यांच्या सफाईचे खर्या अर्थांने धिंडवडे निघाले आहेत. गावात गटारे व मल:निस्सारण वाहिन्या तुंबल्याने रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौचाच्या व गटाराच्या पाण्यातून रहीवाशांना ये-जा करावी लागत आहे. पावसाळी पूर्व कामे सारसोळे गावात झालीच नाही. कै. बुध्या बाळ्या वैती या गावातील अर्ंतगत मार्गावर चोकअप झालेल्या गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या गटाराच्या वाहिन्यांची सफाईच कधी होत नाही. वेळोवेळी गटाराच्या वाहिन्यांची सफाई झाली असती तर सारसोळेकरांना आज शौचालयाच्या व गटाराच्या पाण्यातून ये-जा करावी लागली नसती. कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर तुंबलेल्या गटारांच्या वाहिन्यामुळे लोकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. या ठिकाणी व सारसोळे गावात गटारांची वाहिन्यांची किती वेळा सफाई झाली आहे, सफाई कधी होते याचा लेखी अहवाल पालिका प्रशासनाकडून मिळावा. सारसोळेच्या तुंबलेल्या गटारांच्या वाहिन्यांची आजची अवस्था पाहता या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
पावसाळी पूर्व कामे सारसोळे गावात झालीच नाही. कै. बुध्या बाळ्या वैती या गावातील अर्ंतगत मार्गावर मल:निस्सारण वाहिन्या फुटल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाईच कधी होत नाही. वेळोवेळी मल:निस्सारण वाहिन्या सफाई झाली असती तर सारसोळेकरांना आज शौचालयाच्या व गटाराच्या पाण्यातून ये-जा करावी लागली नसती. कै. बुध्या बाळ्या वैत ी मार्गावर तुंबलेल्या मल:निस्सारण वाहिन्यामुळे लोकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. या ठिकाणी व सारसोळे गावात मल:निस्सारण वाहिन्यांची किती वेळा सफाई झाली आहे, सफाई कधी होते याचा लेखी अहवाल पालिका प्रशासनाकडून मिळावा. सारसोळेच्या तुंबलेल्या मल:निस्सारण वाहिन्यांची आजची अवस्था पाहता या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
आज गावात व बुध्या बाळ्या वैती मार्गावर तुंबलेल्या गटाराच्या वाहिन्यांचा व पावसाळीपूर्व कामाचा भाग म्हणून गावात झालेल्या गटाराच्या व मल:निस्सारण वाहिन्यांचा सफाईचा लेखी अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा, सारसोळेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण करणार्या गटर व मल:निस्सारण वाहिनी सफाई करणार्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून चांगले काम करणार्या नवीन कार्यक्षम ठेकेदारांची सारसोळेकरता नियुक्ती करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.