मालमत्ताधारकांना तपशील तपासणीचे आवाहन
नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेल्या सर्व बांधीव मालमत्तांचे सर्वेक्षण करून अद्ययावत तपशील सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर अवलोकन आणि सुधारणांसाठी उपलब्ध करून दिला असून मालमत्ताधारकांनी संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या मालमत्तांच्या तपशीलांची शहानिशा करावी आणि तफावत आढळल्यास त्यासंदर्भात सिडकोच्या सांख्यिकी विभागाशी संपर्क साधून माहीती अद्ययावत करून घ्यावी जेणेकरून भविष्यातील कार्यवाही सुलभ होईल असे आवाहन सिडको महामंडळातर्फे करण्यात येत आहे.
स्थापनेपासून सिडकोने नवी मुंबईतील विविध नगरांमध्ये सदनिका, दुकाने, कार्यालयीन गाळे अशा एकूण 1,35,000 मालमत्तांचा विकास करून त्या वापरनिहाय तपशीलानुसार नागरीकांना भाडेपट्ट्याने वितरित केल्या आहेत. या सर्व मालमत्तांचा तपशील संकलित करण्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये मे. ध्रुव कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्त संस्थेने सर्व मालमत्तांना स्थळभेट देऊन विद्यमान मालकांकडून उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहीती संकलित केली. ही संकलित माहीती सिडकोच्या वसाहत विभागातील दस्तऐवजांशी जुळवून संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
मे. ध्रुव कन्सल्टन्सीने 15 फेब्रुवारी 2017 ते 15 मे 2018 या 15 महिन्याच्या कालावधीत घरोघरी जाऊन या मालमत्तांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणा दरम्यान मालमत्ता उपभोक्त्याने उपलब्ध करून दिलेले दस्तऐवज वसाहत विभागाच्या अभिलेखावरून सत्यापित करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विक्री न झालेल्या तसेच वापरात नसलेल्या मालमत्तांची अधिकृत माहीती संकलित करणे शक्य झाले आहे. या विक्रीसाठी उपलब्ध मालमत्तांची लवकरच योजना जाहीर करून विक्री करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक नगरामधील गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि राहती घरे यांची वर्षनिहाय माहीती संकलित करण्यात आली आहे.
नागरीकांच्या सुविधेकरीता आणि डिजीटल माध्यमांचा यथायोग्य वापर या उद्देशाने पारदर्शकता धोरणास अनुसरून सदर माहीती संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे. मालमत्ताधारक स्वतः या पोर्टलवर त्यांच्या मालमत्तेची माहीती तपासून सत्यपित करू शकतात. प्रदर्शित तपशिलात तफावत आढळल्यास त्यात सुधारणा करणे अद्ययावत करणे आदी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या मालमत्तेची माहीती पाहण्यासाठी मालमत्ताधारकाने आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक याच्या आधारे प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यास एक वन टाईम पासवर्ड (ओटीपी) मिळेल. लॉगइन करण्यासाठी तो ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आपल्या सदनिका, दुकाने, कार्यालयीन गाळे यांची माहीती प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांच्या अवलोकनार्थ वेगळा दुवा (लिंक) ही देण्यात आला आहे. मालमत्तांची माहीती केवळ विद्यमान मालक ज्यांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक अथवा आधार कार्ड क्रमांक सर्वेक्षणाच्या वेळी उपलब्ध करून दिला त्यांनाच पाहता येईल. या पोर्टलच्या वापरासंदर्भात अथवा भ्रमणध्वनी किंवा आधार कार्ड क्रमांक नोंदणीसाठी मालमत्ताधारकाने सिडकोच्या सांख्यिकी विभागाशी संपर्क साधावा. हे पोर्टल सिडकोच्या www.cidco.maharashtr