नवी मुंबई : सध्या सिडको वसाहतीमध्ये ईमारती पुर्नबांधणीचे वारे जोरात वाहत आहे. आपल्या राहत्या घराचा प्रश्न असल्याने सर्व माहिती मिळाल्याशिवाय घराची चावी कोणालाही देवू नका. कोणत्याही राजकारण्यांच्या आहारी न जाता पुर्नबांधणी व बिल्डरची पूर्ण माहिती घ्या. कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी केले.
सुसंवाद आमदारांचा या अभियानाचा एक भाग म्हणून आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी रविवारी नेरूळ सेक्टर सहामधील शिवम आणि दत्तगुरू या दोन सोसायटीतील रहीवाशांच्या भेटी घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांच्यासमवेत भाजप पदाधिकारी विजय घाटे, राजू तिकोणे, अर्जुन चव्हाण, अमर पाटील, विलास चव्हाण, प्रदीप बुरकुल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवम सोसायटीतील रहीवाशांसमोर बोलताना आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी गेल्या चार वर्षात आपण केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. रहिवाशांनी एफएसआय, पुर्नबांधणी व अन्य समस्यांवर विचारलेल्या प्रश्नांवर आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी उत्तरे दिली. सोसायटी तुमची आहे, सदनिका तुमच्या आहे. जो निर्णय घ्याल तो सर्वानी एकमेकांना विश्वासात घेवून घ्या. कोणताही गैरसमज आपसात निर्माण करून नका. बिल्डर तुम्हीच शोधा. कागदपत्रे तपासा. रेरा कायद्यामध्ये त्या बिल्डरची नोंदणी पाहिजे. त्याची गृहनिर्माण प्रकल्प करण्याची ताकद पाहिजे. उद्या तो पळून गेला तर तुमचे संसार रस्त्यावर येता कामा नये असे यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी उपस्थितांना सांगितले.
भाजप पदाधिकारी व एफएसआय एक्सपर्ट म्हणून ओळखल्या जाणार्या विजय घाटे यांनी यावेळी शिवम व दत्तगुरू सोसायटीतील रहीवाशांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवम सोसायटीतील माजी अध्यक्ष दिगंबर गांवकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना घाटे व आमदार मंदा म्हात्रे यांनी उत्तरे दिली. सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार नलावडे यांनी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांचा तर सोसायटीचे पदादिकारी प्रभाकर पगारे यांनी विजय घाटे यांचा सत्कार केला. यावेळी शिवम सोसायटीतील खजिनदार सौ. सुवर्णा खांडगेपाटील, पदाधिकारी अभिमन्यू, दिलीप ढेरे, गणपत सावर्डेकर, शेळके, काकडे मॅडम, माजी पदाधिकारी अत्तार, अरूण निकम, सोपान सावंत, तांबे, रमेश मार्कडे, नारायण खामकर, भिमराज शिंदे यांच्यासह सोसायटीतील रहीवाशी व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवम सोसायटीनंतर आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी दत्तगुरू सोसायटीला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे प्रल्हाद पाटील व शिवसेनेचे शाखाप्रमुख व दत्तगुरूचे स्थानिक रहीवाशी दिलीप आमले हेही अभियानात सहभागी झाले होते. सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र बागल यांनी सोसायटीतील वाटचाल विषद करताना पुर्नबांधणी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी दत्तगुरू सोसायटीला पुर्नबांधणीबाबत सुरूवातीपासून आपण सहकार्य केले असल्याची आठवण आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सोसायटीच्या पदाधिकार्यांना व रहीवाशांना करून दिली. सिडको कार्यालयात आपण दत्तगुरुच्या लोकांना घेवून गेलो. यापुढेही दत्तगुरूच्या रहीवाशांना आपण कदापि वार्यावर सोडणार नाही तसेच त्यांना जी जी मदत लागेल ती आपण करणार असल्याचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.