अमोल इंगळे
नवी मुंबई : आषाढी एकादशी निमित्त हिंदूह्रूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे युवा मंच यांच्या माध्यमातून तुळशी वाटप व फराळाचे आयोजन करण्यात आले.भविकांनी मनोभावे विठ्ठलाची पुजा केली आणि फराळाचा आस्वाद घेतला आणि आयोजकांचे कौतुकही केले.
या कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा, बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे ,महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, शहरसंघटिका रोहिणी भोईर, विभागप्रमुख गणेश घाग, नगरसेवक काशीनाथ पवार, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, विभाग संघटीका रेश्मा वेंगुर्लेकर, प्रल्हाद पाटील शाखाप्रमुख राजेश पुजारी, दिलीप आमले, पारिजात पतपेढीचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ व उप युवाधिकारी निखिल रतन मांडवे आदी मंडळी भक्तीभावाने सहभागी झाली होती.
मंडळाच्या वतीने शिवसेनेच्या स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सुनिता रतन मांडवे, शिवसेनेचे माजी नगरसेवक व महापालिकेतील माजी शिवसेना पक्षप्रतोद रतन मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांचे विशेष आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सभासद अनुभव बेळे, सागर शिंदे, विनायक धनावडे, राहूल जगदाळे, अमर जाधव, संजय घोडेकर, सिद्धेश घोडेकर, अदित्य शिंदे, हरी भोसले, मिथुन जगदाळे, अभिषेक साळुंखे, अमोल नवघणे, दिपक पार्टे, अमित जाधव, जेष्ठ शिवसैनिक- बाबजी चांदे, प्रकाश वाघमारे, शरद पांजारी, सुरेश मोरे, भास्कर बागल, गौतम शिरवाळे, कुंभारकर काका, निगडे साहेब, संतोष नवघणे, मांढरे दादा, महिला आघाडीच्या शलाका पांजरी, संगिता चांदे, जयश्री बेळे, शुभांगी परब, महाडीक मॅडम, घोडेकर काकी आदींनी परिश्रम घेतले.