श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सानपाडा येथील विश्वेश्वर एज्यकेशन सोसायटीच्या इंदिरा इन्स्टीट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या प्राचार्यांकडे युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी फीबाबत कॉलेजचे धोरण लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली.
युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, युवा सेनेचे युवा अधिकारी मयूर ब्रीद, युवा सेनेचे चिटणिस प्रवीण कांबळे, नगरसेवक व युवा सेनेचे चिटणिस विशाल ससाणे, उपविधानसभा संघटक गणेश पावगे, उपविभाग अधिकारीमनोज जाकते, संकेत मोरे, शाखा अधिकारी सुरेश कदम, अजय तळेकर उपशाखा अधिकारी विनायक धनावडे, समीर धुमाळ, अमित कांबळे व कल्पेश आंबवले यांच्यासमवेत कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेत दोन दिवसाच्या अवधीत कॉलेजचे फीविषयक धोरण लेखी स्वरूपात देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी केली.
विश्वेश्वर एज्यकेशन सोसायटीच्या इंदिरा इन्स्टीट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या शैक्षणिक संस्थेमध्ये मुंबई विद्यापिठाने निर्धारित केलेल्या फीपेक्षा अतिरिक्त फी आकाराल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून आल्या युवा सेनेच्या निखिल मांडवे यांच्याकडे आल्या होत्या. एमबीएसाठी विद्यापिठाने निश्चित केलेल्या फीपेक्षा ७०,३०० ही अतिरिक्त फी या कॉलेजकडून घेतली जात आहे. विद्यापिठाने ट्यूशन फी, डेव्लपमेंट फी आकारण्यासाठी आपणास मुभा दिलेली आहे. तथापि आपण कोणत्या निकषावर ७० हजार इतकी मोठ्या प्रमाणावर फी आकारात आहात, त्याबाबत आपणाकडून लेखी खुलासापत्र अपेक्षित आहे. आपण एमबीएसाठी किती फी आकारता, आपणास किती फी आकारण्याची मुभा आहे, अतिरिक्त फी हा काय प्रकार आहे, तब्बल ७० हजार रूपये अतिरिक्त फी आपण कोणत्या निकषावर घेता, यासाठी आपण कोणाची परवानगी घेतलेली आहे, या सर्व बाबींचा आढावा आम्हाला आवश्यक आहे. अतिरिक्त फी म्हणून ७० हजार रूपये आकारताना आपण कोणत्या सुविधा देता, त्या ७० हजार रूपयांमध्ये नेमका कशाकशाचा समावेश होत आहे याचीही आम्हास माहिती हवी असल्याची शिष्टमंडळातील शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी कॉंलेजच्या प्राचार्याकडे मागणी केली.
अतिरिक्त फी ७० हजार रूपये आपणाकडून आकारली जात असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. आपण शैक्षणिक कार्य करताना अतिरिक्त फीविषयी आम्हाला लेखी खुलासा करावा अशी मागणी निखिल मांडवे यांनी कॉलेजच्या प्राचार्याकडे केली आहे.