नवी मुंबई : बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सुसंवाद अभियानाने बेलापुर मतदारसंघात जोर पकडला आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे रविवारी, दि. २९ जुलै रोजी सकाळी नेरूळ सेक्टर सहामधील शिवम व दत्तगुरू या दोन सिडको सोसायट्यांना भेटी देणार असून तेथील रहीवाशांशी सुसंवाद साधणार आहे.
याच अभियानार्ंतगत रविवार सकाळी ११ वाजता सिडकोच्या बी टाईप शिवम या ९६ सदनिकांच्या सोसायटीला भेट दिल्यावर १२ वाजता सिडकोच्या ए टाईप दत्तगुरू या १३६ सदनिकांच्या सोसायटीला भेट देणार आहे. या भेटीविषयी शिवमचे अध्यक्ष विजयकुमार नलावडेसर आणि दत्तगुरूचे अध्यक्ष राजेंद्र बागलसर यांना कळविण्यात आले असून सोसायटीतील अन्य रहीवाशांनाही अभियानाची कल्पना देण्यात आली आहे. या अभियानात आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंसमवेत भाजपचे जिल्हा सरचिटणिस विजय घाटे (माऊली) व अन्य पदाधिकारी सहभागी होणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून रहीवाशांना आमदार सौ. मंदाताई्र म्हात्रे यांच्याशी सुसंवाद साधणे शक्य होणार असून विकासाबाबतच्या संकल्पना याबाबतही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व स्थानिक रहीवाशांमध्ये विधायक चर्चा होणार आहे.