नवी मुंबई : आयकॉनिक इमारत म्हणून नावाजली जाणारी नवी मुंबई महानगरपालिकेची ग्रीन बिल्डींग गोल्ड मानंकित मुख्यालय वास्तू भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगी रंगात झळाळून निघालेली असून नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच पाम बीच मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांचेही आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे मुख्यालयाच्या आतील भागातही तिन्ही मजल्यांच्या कठड्यांवर केलेल्या कल्पक कापडी तिरंगी डिझाईनमुळे आधीच नितांतसुंदर असलेल्या मुख्यालय वास्तुच्या सौदर्यात लक्षणीय भर पडलेली आहे.