नवी मुंबई : शिक्षण व्हिजन हाती घेऊन गुणवत्तापूर्व शिक्षणावर भर देत नानाविध उपक्रम राबविणा-या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दैनंदिन घडामोडींची माहिती होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडावी व इंग्रजी वर्तमानपत्र वाचनातून त्यांना इंग्रजी भाषेची गोडी व सवय लागावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून महापालिका शाळांतील इयत्ता आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार “द हिंदू” वर्तमानपत्र तसेच 73 शाळांच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी टॅबलॉईड हे नियतकालीक उपलब्ध करून दिले जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ध्वजारोहणानंतर महापौर श्री. जयवंत सुतार, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, परिवहन समिती सभापती श्री. रामचंद्र दळवी, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेवक श्री. अविनाश लाड, डॉ. जयाजी नाथ, श्री. गिरिश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील व श्री. रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किरणराज यादव, शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे व इतर विभागप्रमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभाप्रसंगी उपस्थित महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना “द हिंदू” वर्तमानपत्राचे वितरण करण्यात आले.