स्वयंम न्युज ब्युरो
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गुरुवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय,मुंबई येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश प्रवक्ते व माध्यमविभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते मधू चव्हाण व अतुल शाह यांनी यावेळी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष शलाका साळवी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अटलजींची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळल्यानंतर प्रदेश कार्यालयात सकाळपासूनच कार्यकर्ते जमा झाले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महामृत्यूंजय जप करण्यात आला. सायंकाळी अटलजींच्या निधनाची बातमी आल्यानंतर कार्यकर्ते शोकाकूल झाले.